ऑफ पिरेड
नमस्कार मी राही. welcome back to हितगुज with राही. कसे आहात सगळे? काळजी घ्या... सुरक्षित राहा ... तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाच, भरभराटीच आणि आरोग्य पूर्ण जावो हीच सदिच्छा.
Happy New Year. let's Welcome 2020 with all positive vibes.
सरत्या वर्षाच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना जाणवत की ट्वेंटी-ट्वेंटी, 2020 हे वर्ष वेगळं होतं. म्हणजे आजवरच्या आयुष्यात फेस न केलेली अनेक चॅलेंजेस या वर्षात समोर उभी ठाकली होती. खरंतर प्रत्येक वर्ष काही ना काही चॅलेंजेस घेऊनच येतं, आणि आपण प्रत्येक जण त्याच्याशी दोन हात करंत, आपापली लढाई लढत असतो. पण हे वर्ष वेगळं होतं. आपल्या सगळ्यांसमोर उभं असलेलं चॅलेंज एकच होतं आणि त्याच्याशी दोन हात करण्याची पद्धत कॉमन होती... lockdown... त्यामुळे हे वर्ष थोडा थांबल्या सारखं वाटलं. आपल्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात स्लो डाऊन करायला भाग पाडणारं वाटलं. हे वर्ष आयुष्यात एक ठहराव घेऊन आलं. जसा मोकळा वेळ आपल्याला शाळेत असताना मिळायचाना तसं..
शाळा संपली आणि जे जगणं सुरू झालं, ते नेहमीच घड्याळाच्या काट्याला बांधलेलं होतं.. गरगर गरगर फिरणारं... शाळेतले दिवस हे आयुष्यातले सुंदर दिवस होते. आणि त्यातही सगळ्यात बेस्ट टाईम म्हणजे 'ऑफ पिरेड'. एखाद्या विषयाच्या बाई सुट्टीवर असल्या की तो तास ऑफ मिळायचा. total me time... काय हवं ते करायचं. as per your choice... आपण काय करावं हे dectect करणारं कुणी नसायचं. आपण आपला वेळ आपल्याला हवा तसा वापरायचा. कुणी चित्र काढायचं, कुणी पुस्तक वाचायचं, कुणी खेळायंचं, कुणी गाणं म्हणायचं, कुणी विणकाम भरतकाम करायचं, कुणी अभ्यास करायचं, कुणी गप्पा मारायचं... ज्याला जे आवडेल ते...
मी काय करायचे माहिती आहे? मी संगळ्यांना गोष्ट सांगायचे.. दुसऱ्या बाई वर्गावर आल्या तरी मला गोष्ट सांगायला सांगायच्या. मी तयारच असायचे. रोज रात्री झोपताना आईकडून एक गोष्ट ऐकायची. त्यामुळे कायम गोष्टींचा खजिना तयार असायचा. कोणी निंदा कोणी वंदा मी आपली सुरू.. 😂😂😂.. हॅट्स ऑफ टू ऑल माय स्कूल फ्रेंड्स, ज्यांनी एवढी वर्ष माझ्या गोष्टी झेलल्या..😂😂😂...
हा तर.. ऑफ पिरेड... मला हे वर्ष त्या ऑफ पिरेड सारखं वाटलं. हे वर्ष आपल्यासाठी ती संधी घेऊन आलं होतं. त्याला जे जे आवडेल ते ते करण्याची संधी... आपल्या व्यस्त करियर मधून वेळ काढून थोडावेळ स्वतःसाठी देण्याची संधी... हे वर्ष 'तो' ठहराव घेऊन आलं होतं.
आणि आजूबाजूला पाहिल्यानंतर जाणवते की माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींनी या संधीचा पुरेपूर वापर केला. कुणी बेकिंग सुरू केलंय, तर कुणी स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलंय, कुणी आपले सूर पुन्हा छेडतंय, कुणी गार्डनींग करतंय, कुणी मुलांबरोबर मनसोक्त खेळत आहे, तर कुणी कुटुंबासाठी मनभर स्वयंपाक करत आहे, कुणी फोटोग्राफी करतंय, कुणी क्रोशे विणकाम करून स्वतःचा व्यवसाय उभा करतंनय, कुणी क्ले मोल्डिंगचे दागिने बनवतंय, तर कोणी फिटनेससाठी व्यायाम करतंय आहे, तर कुणी आध्यात्मिक प्रगतीसाठी मेडिटेशन करतंय. प्रत्येकाचं आपलं आपलं... काहीतरी वेगळं... युनिक... स्वतःला विलक्षण आनंद देणारे आणि समाधान मिळवून देणारं काही ही काम... आता एक काम नक्की करुया. आनंद देणारी जी गोष्ट, या ऑफ पिरेडमध्ये सापडली आहे, तिचा हात घट्ट धरुन ठेवू.
मला ही माझं passion सापडलंय. माझा पॉडकास्ट मला खूप आनंद मिळवून देतो. I hope...I wish... तो आनंद मी माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकेन....आणि तुम्ही सगळे, मनापासून ऐकता, तुमच्या प्रतिक्रिया कळवता, यासाठी मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रियांमुळे काम करायला हुरूप येतो. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद याही वर्षी माझ्यासोबत राहो, हीच विनंती. Thank u so much...
ऐकत राहा हितगुज with राही...
Mastch
ReplyDeleteSundar!! Congratulations Rahi!!
ReplyDelete