Posts

आनंदाचं झाड..

Image
आनंदाचं झाड..  माझ्या मनात मोहरलय आज आनंदाच झाड  आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड...  आनंदाच्या तिजोरीला चाव्या आहेत अनेक  अनेक चाव्या असल्या तरी कुलूप मात्र एक कोणत्या चावीने उघडावे कुलूप, हे असतं एक कोडं  आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड... कुलूप एक असलं तरी प्रत्येकाची चावी वेगळी  आपली चावी हुडकण्यातच गंमत असते सगळी  आपापली चावी शोधण्यासाठी, थांबावं जरा थोडं  आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड... इथे copy paste चालतच नाही  कुणाचीतरी चावी उचलून, कुलूप उघडण्याची नको घाई  आपली uniqe चावी शोधण्यातच, खरं सुख सापडेल नाई  थोडा वेळ लागला तरी अडणार नाही घोडं  आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड... नक्की सापडेल ना आनंद आनंदाच्या तिजोरीत? पण तो तर कधीच सापडत नाही शोधून  तो अनुभवता येतो, आपला आपण  निर्माण करून  म्हणूनच म्हणतेय, माझ्या मनात मोहरलय आज आनंदाच झाड  आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड...  -राही  #मी_आनंदी_रहायचं_ठरवलंय ... P.S. हा फोटो आमच्या  #diy  अत्तराची कुपी आणि मानाचं...

गृहस्वामिनी

गृहस्वामिनी            नमस्कार! मी राही.  वेलकम बॅक टू  हितगुज विथ राही. कसे आहात सगळे? काळजी घ्या सुरक्षित रहा.       एक बातमी वाचली, 'गृहलक्ष्मी', 'होम मेकर', 'गृहिणी', 'गृहस्वामिनी' या पदावर काम करणाऱ्या बायकांसाठी वेतन सुरू करणार आहेत म्हणे. मग त्यावर उहापोह, चर्चा, मतमतांतर...  कोणी पांढरपेशी महिला म्हणाली, की हे कनिष्ठ मध्यमवर्गासाठी आहे.  त्या बायका शिकलेल्या  नसतात. म्हणजे मुळात सांगायचा उद्देश असा, की हे माझ्यासाठी नाही हं. थोडक्यात मला कशाला?  म्हणजे मी घरी जी कामं करते, ती प्रेमाने करते. मा‍झ्या कुटुंबासाठी करते. मा‍झ्या इच्छेने करते. त्यात मला पगारी नोकरासारखं वागवलं तर मला अजिबात आवडणार नाही.  मी मा‍झ्या घरची राणी आहे, नोकर नाही. love n respect is my salary. मुद्दा बरोबर वाटतोय. पण खरंच हा प्रश्न कनिष्ठ मध्यमवर्गासाठी किंवा गरीब बायकांसाठी आहे का? मा‍झ्या मते नाही, अजिबात नाही. त्या बायका बऱ्याच वेळा फायनान्शियली आणि इतरही अनेक बाबतीत त्या इतक्या जास्त independent असतात,  की मध्यम...

ऑफ पिरेड

नमस्कार मी राही. welcome back to हितगुज with राही.  कसे आहात सगळे? काळजी घ्या... सुरक्षित राहा ... तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाच, भरभराटीच आणि आरोग्य पूर्ण जावो हीच सदिच्छा.  Happy New Year. let's Welcome 2020 with all positive vibes. सरत्या वर्षाच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना जाणवत की    ट्वेंटी-ट्वेंटी,  2020 हे वर्ष वेगळं होतं. म्हणजे आजवरच्या आयुष्यात फेस न केलेली अनेक  चॅलेंजेस  या वर्षात समोर उभी ठाकली होती.  खरंतर प्रत्येक वर्ष काही ना काही चॅलेंजेस घेऊनच येतं, आणि आपण प्रत्येक जण त्याच्याशी दोन हात करंत, आपापली  लढाई लढत असतो. पण हे वर्ष वेगळं होतं. आपल्या सगळ्यांसमोर उभं असलेलं चॅलेंज एकच होतं आणि त्याच्याशी दोन हात करण्याची पद्धत कॉमन होती... lockdown... त्यामुळे हे वर्ष थोडा थांबल्या सारखं वाटलं. आपल्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात स्लो डाऊन करायला भाग पाडणारं वाटलं. हे वर्ष आयुष्यात एक ठहराव घेऊन आलं. जसा मोकळा वेळ आपल्याला शाळेत असताना मिळायचाना  तसं..  शाळा संपली आणि...