गृहस्वामिनी

गृहस्वामिनी   

     नमस्कार! मी राही.  वेलकम बॅक टू  हितगुज विथ राही. कसे आहात सगळे? काळजी घ्या सुरक्षित रहा. 

    एक बातमी वाचली, 'गृहलक्ष्मी', 'होम मेकर', 'गृहिणी', 'गृहस्वामिनी' या पदावर काम करणाऱ्या बायकांसाठी वेतन सुरू करणार आहेत म्हणे. मग त्यावर उहापोह, चर्चा, मतमतांतर...  कोणी पांढरपेशी महिला म्हणाली, की हे कनिष्ठ मध्यमवर्गासाठी आहे.  त्या बायका शिकलेल्या  नसतात. म्हणजे मुळात सांगायचा उद्देश असा, की हे माझ्यासाठी नाही हं. थोडक्यात मला कशाला?  म्हणजे मी घरी जी कामं करते, ती प्रेमाने करते. मा‍झ्या कुटुंबासाठी करते. मा‍झ्या इच्छेने करते. त्यात मला पगारी नोकरासारखं वागवलं तर मला अजिबात आवडणार नाही.  मी मा‍झ्या घरची राणी आहे, नोकर नाही. love n respect is my salary. मुद्दा बरोबर वाटतोय. पण खरंच हा प्रश्न कनिष्ठ मध्यमवर्गासाठी किंवा गरीब बायकांसाठी आहे का? मा‍झ्या मते नाही, अजिबात नाही. त्या बायका बऱ्याच वेळा फायनान्शियली आणि इतरही अनेक बाबतीत त्या इतक्या जास्त independent असतात,  की मध्यम वर्गाने त्यांच्याकडून शिकून घ्यावं. बऱ्याच वेळा त्या त्यांच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवतात, घरचे सगळे निर्णय, सगळी सूत्रही त्यांच्या हातात असतात. पण दारू आणि इतर प्रश्नांमुळे त्यांची प्रगती होत नाही. त्यांचे प्रश्न खूप वेगळे आहेत. या बायका pregnant असताना सुद्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करतात. पण मग त्या बाळाच्या जन्मानंतर, बाळ लहान असताना त्यांना थांबावं लागतं. 'stay home mom'.  त्यावेळी मात्र  त्यांना वेतन भात्याची खरंच गरज असते. मागे आमच्या मावशी मला सांगत होत्या, बाळ अंगावर पीत होतं आणि दोन-दोन दिवस त्यांना घरी खायला सुद्धा काहीच मिळायचं नाही. बाळ लहान असल्यामुळे कामालाही जाता यायचं नाही. अशा  'stay home mom'.  साठी  वेतन, ही खूप गरजेची गोष्ट आहे. पण ते तेवढ्या पुरतच. नंतर त्या फक्त गृहिणी म्हणून जगत नाहीत. आर्थिक दृष्ट्‍या ते  शक्य नसते. परवडणारं नसतं. पण शिकल्या सवरलेल्या  मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांचं काय?  त्यांच असं होत नाही. त्यांना  विचार करता येतो. विचार मांडता येतो. पण सुसूत्र विचार केला जातो का? की संस्काराच्या ओझ्याखाली दबलेली घुसमट, म्हणजेच  विचार वाटतो? देव जाणे. गरीब बायकांना विचार करायला वेळच नसतो. दोन वेळची पोटा-पाण्याची  जुळवाजुळव करण्यात विचार मरून जातो. त्यामुळे गृहस्वामिनीला वेतन, हे मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांसाठीच आहे. हे लक्षात घेतले  पाहिजे. कायद्याच्या इतर बाबी हा मुद्दा वेगळाच. 

    मग हा विचार जोर धरतो की प्रेमाने घरी केलेल्या कामाची किंमत कशी ठरवणार? आणि त्याची खरंच गरज आहे का? एक लक्षात घ्यायला हवं, घरी केलेल्या कामाचा मोबदला घ्यायला, ती काही  मोलकरीण नाही. ती गृहस्वामिनी आहे. ती घराची राणी आहे. हा फक्त कामाचा मोबदला नाही. हा प्रश्न तिच्या फायनान्शिअल इंडिपेंडन्सचा आहे. तिने तिचा पैसा कसा खर्च करावा, तिची आर्थिक गणित कशी सोडवावी, फ्यूचर इन्वेस्टमेंट, मजा-मौज  याची जबाबदारी कशी पार पाडावी, याचं स्वातंत्र्य तिला आहे का? अगदी ती कमावती असली तरी..  तरीसुद्धा हा प्रश्न उरतो. unfortunately तिचे आर्थिक निर्णय घेताना, rather कोणतेही निर्णय घेताना तिला घरच्यांची परवानगी विचारावी लागते. is n't that ?

    खूप कमी बायका आहेत, ज्यांनी त्यांच आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं आहे. स्वातंत्र्य मिळवावं लागत. समाज प्रवाहाच्या विरोधात असेल तर त्यात कायदा मदत करतो. हे देखील स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, याची जाणीव निर्माण करतो. आर्थिक गणितात  gender equality विसरली जाते. तिची जाणीव व्हावी, म्हणून कायदा गरजेचा असतो.

    तुम्ही म्हणाल शिकलेली सावरलेली आहे, तर तिने तिचं कमवावं, वेतनाची काय गरज? ती कमवती असेल किंवा नसेल...it's not about her earning, it's about her spending. तिला तिच्या खर्चाचं management करण्याचं स्वातंत्र्य आहे का? की तिला परवानगीची  गरज लागते? तिचं घरात राहणं हा तिचा choice असू शकतो. किंवा ते तिच्यावर लादलं गेलेलं देखील असू शकतं. राजरोसपणे विवाह मंडळाच्या जाहिरातीत, अपेक्षा म्हणून अगदी सहजपणे लिहिलं जातच की, 'गृहकर्तव्यदक्ष, शिकलेली, नोकरी नं करणारी, देखणी, गोरी मुलगी हवी.' यात कुणालाच काही गैर वाटत नाही. आमच्या घरी आर्थिक सुबत्ता आहे...  पण मग... तिला आल्या-आल्या त्या सुबत्तेत अधिकार आहे का? वाटा आहे का?...जर नसेल, तर तिचा कमावण्याचा हक्क नाकारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला... आणि कमवती  मुलगी  घरी आणली तर तिचे आर्थिक निर्णय स्वत:कडे राखून ठेवण्याचा अधिकार तरी  तुम्हाला कोणी दिला..?  तुम्हाला वाटेल की अशा अपेक्षा आणि कंडिशनस असतील तर मुलीने सरळ सरळ नकार द्यावा. पण लग्नाच्या बाजारात....हो...'बाजारात'.... हे सगळं सोपं साधं सरळ नसतं. आणि समाजाचा प्रवाहच  विरुद्ध दिशेला वाहत असेल, तर मग फारच अवघड होतं. म्हणूनच मग या चुकीच्या प्रवाहाला बांध घालण्यासाठी, चुकीच्या रूढी मोडण्यासाठी कायद्याची चौकट लागते.

    यात बायकांची एक दुसरी category पण  मी पाहिली आहे. ज्यात त्यांना कधीच काही करण्याची इच्छा नसते. स्वत:चं असं काही काम करण्याची कुवतही नसते. लहानपणापासून कधीच तसा विचारही केलेला नसतो. पण वडिलांच्या, मग नवऱ्याच्या  आणि मग मुलाच्या जीवावर, 'रोब झाडना' बरोबर जमत.  वडिलांनी, नवऱ्याने आणि नंतर मुलाने कष्ट करून कमावलेले पैसे, हे आपलेच आहेत, असं गृहीत धरून, त्यांच्या बिचाऱ्यांच्या सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेवता येतात. व्यक्ती  तितक्या प्रकृती.. असो. हा कायदा त्यांच्यासाठी नसावा.. lol...

    पण over all, घरी राहण्याचा निर्णय घ्यावा लागण्याला अनेक कंगोरे आहेत. आर्थिक गरज नसल्यास, करिअर दुय्यम पातळीवर नेण्यास  बाईला प्रेशराईज  केलं जातं. इथे घरच्यांची जबाबदारी तिच्यावर टाकणं गृहीत धरलं जातं. हे गृहीत धरणं संपलं पाहिजे. आणि बायांनो... शक्य असेल तर स्वत:च्या फायनान्शिअल इंडिपेंडन्सचा  बळी जाऊच  देऊ नका. आधीपासूनच ही गोष्ट स्पष्ट करा. आर्थिक गरज असो किंवा नसो, बाईने घराबाहेर पडून काम करणं, मला खूप गरजेचं वाटत. त्यांच्या स्वत:च्या self esteem साठी... पण आपलं आर्थिक गणित सांभाळण्याची जबाबदारी घेतली ना, की त्याबरोबर येणाऱ्या मोठ्या emotional struggle ला ही तिलाच तोंड द्यावे लागते. जसे की घरी किंवा पाळणाघरात असणारी लहान मुलं.. वगैरे वगैरे... त्यामुळे कधीकधी थांबणं, हा choice असू शकतो. अशा वेळा येतात, जेव्हा दोनातलं एक निवडावं लागतं. प्रत्येक गोष्टीचे चांगले वाईट परिणाम आहेतच. काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवाव लागत. पण at least स्वत:चा एक कोपरा  राखून ठेवायला विसरू नका.

    जर गृहिणीला खरोखरच  हे वतन दिलं गेलं, तर हे वतन देताना एक प्रबोधन करणे गरजेचे आहे. काही कारणामुळे करिअर मधून ब्रेक घ्यावा लागला तर बायकांसाठी come back कसा करावा, या दृष्टीने pink.com मदत करते. कारण घरातल्या प्रत्येक सदस्याने आळस झटकून आपली जबाबदारी आणि घराची जबाबदारी वाटून घेतली तर घरात सांभाळण्यासारख काही नसतं, लहान मुलांव्यतिरिक्त... तेव्हा जर तुमचा स्वतःचा आळस गोंजारण्यासाठी, आणि घर सांभाळण्यासाठी, आपण एका स्त्रीला घरात डांबत असू, तर आपण आपलं राष्ट्रीय नुकसान करतोय असं मला वाटतं.  कारण तिची working ability  नाकारून तिची productivity नाकारली जाते. तिने  काम नं करणं, ही गोष्ट तुमच्या घराच्या आर्थिक गणितात महत्त्वाची नसेलही.  पण एक स्त्री, म्हणजे सुशिक्षित समाजाचा 50 टक्के घटक काम करू शकत नसेल तर देशाची प्रगती कशी होणार... म्हणूनच.. may be your family can afford but nation can not... जो काळ तिला घरी राहून वेतन दिलं जातंय, त्या काळात, ती तिची जबाबदारी सांभाळून काय काय  काम करू शकेल, याचंही  प्रबोधन करून, तशी संधी तिच्यासाठी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तो पगार आहे, वेतन आहे, पेन्शन नाही... याचीही  जाणीव करून दिली पाहिजे. नाही तर आयदी बनण्याची एक संधी दिल्यासारखं होईल. इतर कोणी आपल्यासाठी काय करू शकेल, हे नं शोधता, आपण आपल्यासाठी उभं राहायला शिकलं पाहिजे. देव करो मा‍झ्या सगळ्या मैत्रिणींना हे बळ मिळो.. 

ऐकत राहा हितगुज with राही... 

गृहस्वामिनी:  https://youtu.be/rq8P3JjJEak


Comments