आनंदाचं झाड..

आनंदाचं झाड.. 

माझ्या मनात मोहरलय आज आनंदाच झाड 
आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड... 

आनंदाच्या तिजोरीला चाव्या आहेत अनेक 
अनेक चाव्या असल्या तरी कुलूप मात्र एक
कोणत्या चावीने उघडावे कुलूप, हे असतं एक कोडं 
आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड...

कुलूप एक असलं तरी प्रत्येकाची चावी वेगळी 
आपली चावी हुडकण्यातच गंमत असते सगळी 
आपापली चावी शोधण्यासाठी, थांबावं जरा थोडं 
आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड...

इथे copy paste चालतच नाही 
कुणाचीतरी चावी उचलून, कुलूप उघडण्याची नको घाई 
आपली uniqe चावी शोधण्यातच, खरं सुख सापडेल नाई 
थोडा वेळ लागला तरी अडणार नाही घोडं 
आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड...

नक्की सापडेल ना आनंद आनंदाच्या तिजोरीत?
पण तो तर कधीच सापडत नाही शोधून 
तो अनुभवता येतो, आपला आपण निर्माण करून 
म्हणूनच म्हणतेय,

माझ्या मनात मोहरलय आज आनंदाच झाड 
आनंदानं जगण्याचं गुपित आहे लईच ग्वाड... 

-राही 
P.S. हा फोटो आमच्या #diy अत्तराची कुपी आणि मानाचं क्लीन्सर, चा आहे. त्याची  गंमत ऐकायची असेल तर माझा  podcast नक्की ऐका. 'I choose to be happy'
link पहिल्या comment मध्ये दिली आहे. पटकन दाबा आणि नक्की ऐका. 


https://youtu.be/OKNDKPPhGvU I choose to be happy....

 

Comments